Ad will apear here
Next
व्यायामशाळेत होणाऱ्या चुकांकडे दुर्लक्ष नको!
हल्लीच्या अद्ययावत व्यायामशाळा म्हटले, की तिथे स्पिनिंग, झुंबा, पावर योगा, अॅब्स अशा विविध प्रकारच्या व्यायामाच्या बॅचेस असतात. काहीही विचार न करता, कोणाचाही सल्ला न घेता, ‘पैसे वसूल झाले पाहिजेत’, या आवेगात बऱ्याच चुका होतात... यासाठीच ‘पोषणमंत्र’मध्ये आज पाहू या व्यायामशाळेतील चुकांबद्दल...
........................................                       
उत्तम आरोग्यासाठी व्यायामाची नितांत गरज असते, यात कोणाचेच दुमत होणार नाही धावपळीच्या जीवनशैलीत व्यायामशाळेत जाऊन नियमित व्यायाम होतो, कारण आपण तिथे पैसे भरलेले असतात अशी विचारसरणी आता रुजून जुनी झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून आजकाल दिवसेंदिवस नवीन व्यायामशाळा उघडताना दिसत आहेत. या व्यायाम शाळांमधल्या अनेक आकर्षक सवलती आपल्याला आकर्षित करतात. व्यायामशाळांची अंतर्गत सजावटपण भुरळ घालते. 

ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून आपण व्यायामशाळेत जायला लागतो. तेथील वातावरणाने भारावून जातो व आता किती व्यायाम करू, अन किती नको असे आपल्याला होते. अद्ययावत व्यायामशाळा म्हटले, की तिथे स्पिनिंग, झुंबा, पावर योगा, अॅब्स अशा विविध प्रकारच्या व्यायामाच्या बॅचेस असतात. काहीही विचार न करता, कोणाचाही सल्ला न घेता, ‘पैसे वसूल झाले पाहिजेत’, म्हणून रोज ज्या चुका बहुतेकजण करतात, त्या आधी पाहू या.. 

- रोज व्यायामशाळेत मशीनवर भरपूर वजन उचलून व्यायाम करायचा आणि नंतर एक तास झुम्बा किंवा स्पिनिंगची बॅच करून एकूण दोन तास अतिश्रमाचे व्यायाम करायचे.   

- सकाळी लवकर येणारे लोक रिकाम्या पोटी येतात ही दुसरी मोठी चूक. व्यायामाला येण्यापूर्वी खाण्याचे नियोजन महत्त्वाचे असते. कधी, किती व काय खायचे हे माहित असणे आवश्यक आहे.

- व्यायामशाळेच्या आत, भिंतींवर बॉडी बिल्डर्सचे व्हिडिओ किंवा क्लिप्स लावलेले असतात. त्या बघून स्वत:वर परस्पर प्रयोग करणे.

- एकमेकांचे बघून किंवा इतर लोक काय करतात, ते पाहून व्यायाम करणे व प्रशिक्षकाची मदत न घेता आपापसांत मित्रांची मदत घेऊन चुकीचे व्यायाम करणे.

- इंटरनेटवर खूप प्रकारचे डाएट उपलब्ध असतात. काही डाएटचे प्रकार खूपच अघोरी असतात, काही डाएट चटकन वजन कमी करणारे, तर काही वजन वाढवणारे असतात पण ह्या सर्व प्रकारच्या डाएटमध्ये खूप गोष्टींचा समावेश असतो, ज्याचा अजिबात विचार केला जात नाही. याचे नंतर वाईट परिणाम भोगावे लागतात.  

- पूरक घटक, प्रथिने, जीवनसत्व व खनीजांच्या वेगवेगळ्या गोळ्या वापरतांना त्यांची निवड खूप काळजीपूर्वक करावी लागते. या गोळ्या कोणी, किती व केव्हा घ्याव्यात, कोणी घेऊ नये यावर जराही विचार होताना दिसत नाही.

- प्रशिक्षित शिक्षक असणे, ही व्यायामशाळेची पहिली महत्त्वाची जबाबदारी असायला हवी. आपल्याला तब्येतीच्या काही तक्रारी असल्यास, त्याची आधीच कल्पना देऊन ठेवणे गरजेचे असते, पण याविषयी लोक म्हणावे तेवढे जागरूक नाहीत.

- व्यायामशाळेतील आरसे हा ही एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आरशामध्ये बघून व्यायाम करताना आपली शारीरिक स्थिती त्यानुसार  बरोबर आहे का?  हे तपासायचे असते. ती चूकीची होत असल्यास अचूक करण्यासाठी ह्या आरशांचा उपयोग करायचा असतो.   

- व्यायाम करताना अतिकर्कश्श, हाय बिट्स संगीत लावणेही धोकादायक ठरू शकते. व्यायाम करताना आधीच आपल्या हृदयाचे ठोके वाढलेले असतात. त्यात अशा कर्कश्श संगीतामुळे रक्तदाबात वाढ होऊ शकते.

- व्यायामाच्या बाबतीत विद्यार्थ्यांकडून अत्यंत दुर्लक्षित घटक असतो, तो म्हणजे अस्वच्छ कपडे व बूट. यांमुळे त्वचा विकारांची शक्यता बळावते. 

व्यायामाशी संबंधित हे महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे सर्वांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. व्यायामशाळेत जाणाऱ्यांनी या चुका कशा टाळता येतील याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. पुढील लेखात यावर आणखी तपशीलवार विचार करू या.  आपल्या शरीरावर अशा गोष्टींचा विपरीत परिणाम होत असतो. त्याचे परिणाम आपल्याला आयुष्यभर भोगावे लागण्याची शक्यता असते. त्यामुळे असे काही होण्याआधीच सावधानता बाळगलेली उत्तम ठरते.   

- आश्लेषा भागवत
ई-मेल : ashlesha0605@gmail.com

(लेखिका पुण्यातील आहारतज्ज्ञ आहेत) 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZTNBM
Similar Posts
चुकीचे व्यायाम टाळा... व्यायाम हे शरीर क्षमता वाढवणारे व हृदयाची कार्यक्षमता वाढवणारे असतात. यात पीळदार शरीरयष्टी किंवा आजच्या मुलांचा परवलीचा शब्द ‘सिक्स पॅक’ असे काही होत नाही. शरीरावरील चरबी कमी होण्यास व्यायामशाळेतील मशीन्स, डम्बेल्ससारखा वजन उचलण्याचा व्यायाम गरजेचा आहे.... यासाठीच ‘पोषणमंत्र’मध्ये आज पाहू या चुकीच्या व्यायामपद्धतीबद्दल
डाएट म्हणजे नेमके काय? ‘डाएट’चे फॅड सांभाळताना आजकाल स्वतःवर मनानेच विविध प्रयोग केले जातात. असे करण्याने वजन कमी होत नाहीच, उलटपक्षी चुकीचे काहीतरी खाल्ल्याने तब्येतीवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. खरे तर प्रत्येकाच्या आहारात काही गोष्टी समान असल्या, तरी उंची, कामाचे स्वरूप, व्यायामाची सवय, आजार किंवा व्याधी इत्यादी सर्व
बाहेर राहूनही पाळा पौष्टिकतेचा मंत्र... शिक्षणासाठी बाहेरगावी राहणाऱ्या मुलांची आज कमी नाही. बाहेर राहणे म्हणजे अर्थातच हॉस्टेल, मेस या गोष्टी आल्या. एकमेकांचे पाहून वागणे, बोलणे इथपर्यंत ठीक मात्र आजकाल इतरांच्या पाहून मुलांच्या खाण्या-पिण्याच्या सवयीही बदलताना दिसत आहेत. इथूनच सुरुवात होते आरोग्याची हेळसांड होण्याची.... ‘पोषणमंत्र’ या सदरात
आहार, की औषध? आज आपण वर्तमानपत्रात किंवा दूरदर्शनवर अनेक प्रकारच्या औषधांच्या जाहिराती बघतो. वजन वाढवणे, वजन कमी करणे, केस गळणे, उंची वाढवणे अशा समस्यांशी संबंधित जाहिरातींमध्ये दाखवलेले सुडौल बांधे, लांबसडक केस, पीळदार शरीर बघितले, की साहजिकच अनेक लोक या औषधांच्या मोहात पडतात आणि मग आहार-विहार यांच्यापेक्षा शरीरावर औषधांचा मारा जास्त प्रमाणात करतात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language